‘लालपरी’ ला दीड काेटीचा फटका; एसटी सेवा सुरळीत
1 min readनगर दि.३:- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने नगर विभागातील एसटी महामंडळाच्या बसेस बंद हाेत्या. या चार दिवसात एसटीच्या ५ लाख १७ हजार किलोमीटर फेर्या रद्द झाल्या हाेत्या.
दरम्यान, मराठवाड्यात काही एसटी बसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील तसेच बाहेर जाणाऱ्या सर्वच एसटी बस बंद केल्या हाेत्या.
त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काल मनोज जरांगे यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत देत, आपले उपोषण मागे घेतले. त्यामुळे एसटी प्रशासनानेही एसटी वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी आंदाेलन सुरू हाेते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून एसटी बससेवा ठप्प झाली हाेती. त्याचा एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला आहे.
आतापर्यंत नगर विभागातील एसटी महामंडळाचे दीड काेटीचे उत्पन्न बुडाले आहे. मनाेज जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत, उपाेषण मागे घेतल्याने आता एसटी सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.
आता शहरासह ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू हाेतील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.