मी, माझ्या पगारावर समाधानी आहे! ;सातारा येथे गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर फलक; एजंटांचे धाबे दणाणले
1 min readसातारा दि.२६:- शासकीय अधिकाऱ्याच्या टेबलावरून कागद हलविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात. ही गोष्ट लक्षात घेऊन सातारा गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सतीश बुद्धे (रा. लातूर) यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर मी, माझ्या पगारात समाधानी आहे’ हा फलक लावला आहे. विविध कामांच्या निमित्ताने पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांचेच लक्ष हा फलक वेधून घेत आहे.
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून ५ ऑक्टोबरला पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बुद्धे यांनी लावलेल्या या फलकामुळे अनेक एजंटांचे धाबे दणाणले आहेत.
या वर गटविकास अधिकारी (सातारा) सतीश बुद्धे म्हणले की कार्यालयात माझ्या नावाखाली कोणीही कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करू नये यासाठी हा स्पष्ट संदेश आहे.
लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असून, अधिक माया जमविण्याची माझी इच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही, जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच याची सातारकरांनी खात्री बाळगावी.