दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

1 min read

निमगावसावा दि.१८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगावसावा (ता. जुन्नर) येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ग्रंथालयाचा परिचय व महाविद्यालयातील ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला. ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती यानुसार सकाळी १० ते ११ एक तास सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खुले करून आवडेल तो ग्रंथ घेऊन त्याचे वाचन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद शिंदे, प्रा. निलम गायकवाड, प्रा. अनिल पडवळ, प्रा.ज्योती गायकवाड, प्रा. सुभाष घोडे आदी प्राध्यापकांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत तसेच वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व पटवून वाचन संस्कृतीची सद्यस्थिती व अपेक्षा व्यक्त केल्या.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी तर आभार ग्रंथपाल प्रा. मंगल उनवणे यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे