बी.जे.महाविद्यालयाचा आय.सी.एम.ए.आय. च्या पी.सी.ए. चाप्टर पुणे सोबत सामंजस्य करार

1 min read

आळे दि.२६:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित ज्ञानमंदिर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मा.बाळासाहेब जाधव कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे व इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया पी.सी.ए. चाप्टर पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने “ सी.एम.ए. पेशातील करिअरच्या समृद्ध संधी” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत आळे तसेच परिसरातील इतर महाविद्यालयातील एकूण ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत मा.बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे व इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट ऑफ इंडिया पी.सी.ए. चाप्टर पुणे यांच्या मध्ये ‘वाणिज्य व व्यवस्थापन’ या विषयांसंदर्भात शैक्षणिक व संशोधनांचा परस्पर सामंजस्य करार करण्यात आला.या कार्यशाळेप्रसंगी इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया पी.सी.ए. चाप्टर पुणे तर्फे आलेले सी.एम.ए.महेंद्र बोंबे, सी.एम.ए. सागर मालपुरे, सी.एम.ए.संतोष कोरडे, सी.एम.ए.राहुल डावखर आदी तज्ञ मंडळीनी विद्यार्थ्यांना सी.एम.ए. पेशातील करिअरच्या विविध संधी, सी.एम.ए. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ.प्रविण जाधव यांनी या सामंजस्य कराराचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सी.एम.ए. सारख्या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी निश्चितपणे होईल असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे संचालक जीवन शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान आमचे महाविद्यालय व सर्व प्राध्यापक मंडळी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. या सामजस्य करारचा फायदा आळे महाविद्यालयाबरोबरच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील घेता येणार असून पुढील ऑक्टोंबर महिन्यापासून मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालयात, इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया पी.सी.ए. चाप्टर पुणे यांच्याकडून ५० विद्यार्थ्याची सी.एम.ए. फौंडेशन बॅच सुरु करण्यात येणार असल्याचे महाविद्यालायचे प्राचार्य.डॉ.प्रविण जाधव यांनी संगितले.

संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे तसेच संचालक किशोर कु-हाडे, भाउ कु-हाडे बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ , जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.या कार्यशाळेचे प्रास्तविक प्रा.योगेश माने यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.अरविंद कुटे तर आभारप्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.सुरेश कुऱ्हाडे यांनी केले. त्याचप्रमाणे सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य संदिप भवारी, प्रा.संजय वाकचौरे,डॉ. मनिषा गिरी व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष असे सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे