सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.१६:- सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय राजुरी (ता.जुन्नर) येथील इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. इंजिनिअरिंग डे चे औचित्य साधून प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे चेअरमन व्ही. आर. दिवाकरण आणि संचालक सचिन चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून आणि नवीन तंत्र तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत जास्त कौश्यल्यपूर्ण व गुणवत्तायुक्त आभियंते घडवण्याची जबाबदारी आभियांत्रिकी महाविद्यालयाची आहे आणि विद्यार्थ्यानी आपले औदयोगिक ज्ञान वृद्धिंगत करून घेण्याची जिज्ञासा बाळगली पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. बालारामडू यांनी केले.सर मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत १९९८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो गुणवत्ता संवर्धन वसचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्न सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र् शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरवात केली आहे. १९५५ मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविले. त्यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढलेदेशातील अनेक संस्थांना विश्र्वेश्र्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. कर्नाटक सरकाने बंगलोर येथे ‘सर विश्र्वेश्र्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातले सर्वांत मोठे सायन्य म्युझियम आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संचालक सचिन चव्हाण सर, प्राचार्य डॉ. संजय झोपे,उपप्राचार्य पी. बालारामुडू प्रा. रांधवण भागवत, मनोज कुमार, प्रा. मानिकंठ रेड्डी प्रा. वैभव नांगरे, प्रा. भालचंद्र मुंढे प्रा. मांडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल जगदाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल उद्धव भारती आणि मयूर घाडगे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे