बेल्ह्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद; अमानुषपणे झालेल्या लाठीमारीचा ग्रामस्थांनी केला तीव्र निषेध
1 min readबेल्हे दि.९ :- जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेच्या निषेधार्थ बेल्हे (ता.जुन्नर) येथील व्यापा-यांणी शनिवार दि.९ रोजी कडकडीत बंद पाळला.
मराठी समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताणा सराटी- जालना येथे मराठा समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन चालु असताणा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला.
या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी दुपारपर्यंत कडक बंद पाळला. बंद शांततेत पाळण्यात आल्या असून १०० टक्के व्यापारी बंदात सहभागी झाले.बेल्हे बस स्थानकाजवळ ग्रामस्थांनी निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थांनी मराठी समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला तसेच जालना येथील घटनेबाबत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामस्थांनी आरक्षणाला पाठिंबा असल्याचे निवेदन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर यांना दिले.या वेळी साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन वसंत जगताप, जानकु डावखर, माजी उपसरपंच निलेश कणसे, जयवंत घोडके, सुनील आरोटे, मोहन मटाले, रामचंद्र बांगर, मोहन बांगर,सागर लामखडे, बबन औटी,कैलास औटी यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.