आता डाळ काही शिजणार नाही; भाव कडाडले

पुणे दि.२ – दोन महिन्यात सर्वाधिक दरवाढ तुरडाळींची झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो तुरडाळीचे भाव 150 ते 165 रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो डाळीची तब्बल 170 ते 180 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. यामुळे स्वयंपाक घरात पुढील काही दिवस तरी डाळ काही शिजणार नाही असे म्हणण्याची वेळ आली असून गृहिणींच बजेट कोलमड आहे.गेल्यावर्षी मराठवाडा, कर्नाटक व विदर्भात तुरीच्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. पेरणी 30 ते 40 टक्क्यांनी कमी राहिली. यादरम्यान, अतिप्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, तुरीच्या उत्पादनात घट झाली. देशात तुरडाळीची आयात केली जाणाऱ्या म्यानमार या देशातही हिच परिस्थिती दिसत होती. याठिकाणीही, कच्च्या मालाचे भाव जास्त होते. याकाळात, सरकारने तुरीचा हमीभाव वाढविला होता.चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या 50 टक्क्यांपेक्षाही कमी झाल्या आहेत. सध्यस्थिती नामांकित कंपन्यांकडे डाळीचा मोठा पुरवठा आहे. डाळींचे वाढते भाव व अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांनी विक्री थांबविली आहे. हेही तुरडाळींच्या दरवाढीचे प्रमुख कारण आहे. डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नहार यांनी वर्तविली. मूग डाळ आणि उडीद डाळीचे भाव 110 रुपयांवर गेले आहेत. हे भाव कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या भावातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली आहे. यंदा पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीसुद्धा राज्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा देखील बऱ्याच धान्य व कडधान्याचे भाव कडाडलेले असतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे