पद्मभूषण अण्णा हजारेंच्या हस्ते राळेगणसिध्दी येथे गुणवंतांचा सन्मानसोहळा; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

1 min read

पारनेर दि.२४ : -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने राळेगणसिध्दी येथे उद्या शुक्रवार दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता,समाजामधे विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सन्मानसोहळा, तसेच पावसाळ्याचे तोंडावर पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप व ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

देशाचे भूषण जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव डाॅ.विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम होणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हासचिव दत्ता गाडगे यांचे प्रमुख उपस्थितीमधे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


या नेत्रदिपक सोहळ्यामने तुषार ढवण पीएसआय केंद्रिय पोलीस दल, कु.नुतन अनिल चौधरी मुंबई पोलीस, दत्ता करंदीकर लोकशाहीर,आनंदा झरेकर प्राथमिक शिक्षक, तुकाराम अडसुळ प्राथमिक शिक्षक, मनिषा चव्हाण लोक कलावंत आदी गुणवंतांचा सन्मान होणार आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना व मान्यवरांना प्राथमिक शिक्षक आनंदा झरेकर यांचे वतीने एक वृक्ष भेट दिला जाणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे