कोथिंबीर जुडी ५० पैसे तर मेथी जुडी १ रुपया; शेतकऱ्यांनी धना, मेथीच्या ६०-७० हजार जुड्या फेकल्या

1 min read

नारायणगाव, दि. ३१:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव (ता.जुन्नर) उपबाजारात धना मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बाजार भाव मिळत नसल्याने नारायणगाव उपबाजारात शेतकऱ्यांवर धना, मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे.धना, मेथीची शनिवारी (दि. २९) ३ लाख २५ हजार १०० जुडा इतक्या मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यावेळी १०० जुड्यास घना ५१ ते १८०० तर मेथी १०१ ते ९०० प्रमाणे असलेल्या पावसाने मालाची विक्री होत नाही. तर ग्रामीण भागातही धना, मेथीला फारसा उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. धना मेथीला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकन्यांनी नारायणगाव उपबाजारात दहा ट्रैक्टर व पिकअप गाडीतून आणलेल्या जवळपास ६० ते ७० जूड्या फेकून दिल्या.नारायणगाव उपबाजारत टोमॅटोला ६०० ते २२५० रुपये क्रेट इतका बाजार भाव मिळत आहे. मात्र आवक फक्त ८ हजार ७५० क्रेट होती. म्हणजेच टोमॅटोला भाव मिळत असला तरी आवक घटलेली दिसून येते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे