मणिपूर महिला अत्याचाराचे पडसाद घोडेगाव मध्ये उमटले
1 min read
घोडेगाव दि.२६:- घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे मणिपूर महिला अत्याचार घटनेविषयी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने तहसीलदार कचेरीवर मानवी साखळी करून तहसिलदार संजय नागटिळक यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर जिल्हा संघटक एड.अविनाश रहाणे,प्रा.राजाराम बाणखेले, महिला उपजिल्हाप्रमुख कलावती पोटकुले, तालुका प्रमुख दिलीप पवळे,यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रा. सुरेखा अनिल निघोट तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव यांनी मणिपूर घटनेविषयी भाजप, केंद्र सरकारच्या उदासीनते विरुद्ध आवाज उठवला.
यावेळी त्यांनी हे भाजप सरकार व भाजपमधिल सोमैया, ब्रजभुषण, देशमुख सारखे काही जण महिला अत्याचारात पुढे आहेत, मणिपूर ला भाजप मुख्यमंत्री असुन या घटनेवर कारवाई होत नसल्याने, मणिपूर आजही जळत असल्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, भाजप ने सोमैया ची ही हकालपट्टी केली पाहिजे,
पण आजही तो केंद्र सरकारच्या सुरक्षेत खुलेआम फिरतोय, भाजप हा सत्तांध झाला असून निवडणुक आयोग,केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्ष फोडणे, धाडी घालणे यासाठी च चालु असुन भाजपाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे कुस्तीगीर, शेतकरी यांचे आंदोलन दडपशाही मार्गाने दडपुन टाकले, पण महिलांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत.
या लोकशाही च्या मारेकरूंकडुन, फक्त सत्तेसाठी , लुटलेले वाचवायला एकत्र आलेल्यांकडुन न्याय मिळणार नसल्याने महिलांनी फुलनदेवी सारखं स्वतःच आपल्यावर अन्याय, अत्याचार करु पहाणारांना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे. सत्तेच्या अहंकारींनो तुम्ही खुर्ची चा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत, मतदार तुमची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही,
कारण भाजप हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवत असुन जातीधर्मांत तेढ निर्माण करुन, माणसांमध्ये फोडाफोडी करून मराठी माणसांना कमजोर करत असल्याने देशातील लोकशाही वाचवायला जनता सर्व विरोधकांनी एकजुट कायम ठेवावी असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक एड अविनाश रहाणे,प्रा.राजाराम बाणखेले, ऊपजिल्हाप्रमुख कलावती पोटकुले यांनी ही घटनेचा निषेध करुन मणिपूर व देशभरातील महिला अत्याचाराशी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.शिवसेना पदाधिकारी घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोराडे,खादी ग्रामोद्योग मा. अध्यक्ष राजू सोमवंशी , विभागप्रमुख संतोष खात्री, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख अमोल काळे उपस्थित होते.