रोटरी क्लब ऑफ आळेफाटा-मेनच्या अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, तर सेक्रेटरीपदी शुभम ढमाले यांची निवड
1 min read
आळेफाटा दि.१:- जागतिक स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब इंटरनॅशनलच्या ‘रोटरी क्लब ऑफ आळेफाटा-मेन’ या शाखेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षपदी रो. राजेंद्र जाधव यांची, तर सेक्रेटरी (सचिव) पदभार स्वीकारण्यासाठी रो. शुभम ढमाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
विशेष योग म्हणजे, २ जून रोजी नवनियुक्त अध्यक्ष रो. राजेंद्र जाधव यांचा वाढदिवस असल्याने, आळेफाटा परिसर आणि रोटरी परिवाराच्या वतीने त्यांच्यावर निवडीबद्दल अभिनंदन आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. *Create Lasting Impact*’ हेच ध्येय!
रोटरी इंटरनॅशनलच्या यंदाच्या संकल्पनेला अनुसरून आळेफाटा परिसरात
शाश्वत आणि दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पाडणारे सामाजिक प्रकल्प राबवणार असल्याचा मानस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत विशेष काम करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला.सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव या निवडीबद्दल रोटरी क्लबचे सर्व सदस्य,
आळेफाटा परिसरातील मान्यवर आणि पदाधिकारी यांनी नवनियुक्त अध्यक्ष आणि सेक्रेटरींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.अभिनंदन करणारे पदाधिकारी व सदस्य:- रो. अमोल कापसे, रो.डॉ. प्रदीप गुंजाळ, रो.डॉ. महादेव वाणी, रो. गणपत पाटील, रो.ॲड. अमित कुटे, रो.डॉ.अमोल डुंबरे, रो. शिवाजी गोरे सर, रो. जीवन शिंदे, रो. अक्षय मंडलिक,
रो. ऋषी पोळ, रो. गौरव बनकर, रो. हरिषचंद्र वाघुले, रो. विकास मटाले, रो. सचिन डुंबरे, रो. रोशन घुले, रो. मोहन जाधव.तसेच रो. संपत राहणे, रो. निलेश पाषाट, रो.श्री. डॉ. शिवाजी सोनवणे, रो. गणेश मेहेर, रो. सुदाम ढमाले, रो. श्रीकांत मदने सर, रो. डॉ. सुयश गुंजाळ, रो. गौरव कोकणे,
रो. विजय आवटे, रो. राहुल शिंदे, रो. प्रणव काळे, रो. शंकर गडगे, रो. शिवाजी कोते, रो. उल्हास सहाणे, रो. विलास देशमुख, रो. शिवाजी चाळक, रो. गणेश गुंजाळ, रो. श्वेता वाळके, आणि रो. चंदा बांगर आदी सदस्यांनी नवनियुक्त टीमला पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
