चांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू
1 min read
चांडोली दि.२७:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली (ता. खेड) येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती,
इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय वसति गृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून स्टेशनरी साहित्य,
अंथरुण व पांघरुण दरमहा रुपये १ हजार रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थ्यांकरिता अद्यावत ग्रंथालय व संगणक कक्ष आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
अधिक माहितीसाठी अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली ता. खेड, जि. पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.
