बेल्हे प्रादेशिक नळ योजनेला गती येणार; विजय कुऱ्हाडे यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

1 min read

आळेफाटा दि.२७:-बेल्हे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना लवकर पुर्ण करून समाविष्ट सर्व गावांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी नवीन नळ योजनेतून मिळावे यासाठी योजनेचे रखडलेले काम पुर्ण करण्याच्या सुचना देणे कामी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ॲड विजय कुऱ्हाडे यांनी मुंबई येथे भेट घेतली.बहुप्रतिक्षित बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजना २५-३० वर्षेहून अधिक जुनी झालेली असून तीच्या नविनीकरणासाठी माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार व पाणी पुरवठा मंत्री गुलाब पाटील यांनी मंजूरी देवून ९७ कोटी रू मंजूर केले होते. सदर योजनेचे काम रखडलेले असून तातडीने निधी उपलब्ध होणे व योजना पूर्ण करून नव्याने समाविष्ट गावांसह सर्व गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे या कामी सोमवार दि.२५ रोजी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री ना सुनेत्रा पवार यांना भेटून उपाययोजना करणे कामी लक्ष घालावे अशी विनंती अँड विजय कुऱ्हाडे यांनी केली. सुनेत्रा पवार यांनी विषय समजून घेवून कार्यवाही करू अशी ग्वाही दिली.संबंधीत पत्र विभागाला शिफारस करून पाठविले आहे. सुरळीत योग्य पाणी पुरवठा सर्व गावांना व्हावा यासाठी ही योजना अत्यंत गरजेची आहे. तरी सदरचे काम मार्गी लागावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. अशी माहिती कुऱ्हाडे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!