राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘फेअरवेल पार्टी २०२६’ उत्साहात संपन्न

1 min read

कर्जुले हर्या दि.२७:- येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कर्जुले हर्या (ता.पारनेर) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला “फेअरवेल पार्टी २०२६” कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यवर पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार हिंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपप्राचार्य व IQAC प्रमुख डॉ. कृपाल पवार यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि कौशल्य विकासाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश खैरे (CEO, Purple Hat Pvt. Ltd., नाशिक) तसेच डॉ. एस. एन. कडलग (Advisor, Purple Hat Pvt. Ltd.,नाशिक) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर, कौशल्य विकास आणि आयुष्यातील यशाबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार राहणे, मातोश्री ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सत्तार शेख, तसेच मातोश्री सायन्स कॉलेजचे प्राचार्य राहुल सासवडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. तसेच संस्थेच्या अध्यक्षा मिरा आहेर, उपाध्यक्ष डॉ. दिपक आहेर, सचिव डॉ. किरण आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर व शीतल आहेर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडंट शुभाष भाईक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम, छायाचित्रण तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद लुटला. संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि भावनिक क्षणांनी भरून गेले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!