जुन्नर येथे लोककलावंतांचं गजर आंदोलन संपन्न मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर महागजर आंदोलन करणार:- गवनेर सरोदे
1 min read
जुन्नर दि.२३:-जुन्नर येथे लोककलावंतांच्या मागण्यांकरिता व न्याय हक्कासाठी जुन्नर तहसील कार्यालयावर व पंचायत समिती कार्यालयावर भव्य लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं. यामध्ये महिला व ग्रामीण कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेचे 2024 चे प्रस्ताव सांस्कृतिक कार्य संचालनांकडून जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात त्याची कुठलीही कारवाई किंवा अंमलबजावणी झालेली नाही,
त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये मानधन चालू होऊन चार ते पाच महिने झाले परंतु पुणे जिल्हा ग्रामीण कलावंतास मानधन देण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामीण कलावंत वंचित राहत आहे. याच अनुषंगाने ह्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांस देण्यात आले.
त्यांनीही आश्वासन दिले की ज्या इथून मागे झालेल्या चुका आहेत. त्या आम्ही परिपूर्ण अंमलबजावणी करून त्वरित लोक कलावंतांचे मानधन आम्ही चालू करणार आहोत. या सर्व त्यांनी माहिती दिली आहे परंतु जर त्यांनी कलावंतांचे मानधन चालू केले नाही.
तर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर 101 ताशा ढोल वाजून काम बंद आंदोलन छेडणार आहोत. तरी शासनाने आमची दखल घेऊन त्वरित पुणे जिल्ह्याच्या कलावंतांचे मानधन चालू करावे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेर सरोदे यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकास म्हटले आहे. तसेच या मोर्चा करता
जुन्नर येथे अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे निवड समितीचे अध्यक्ष अनिल सोनवणे हे शहापूर येथून हजारो महिला घेऊन उपस्थित राहिले. तसेच हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता बाबुलाल भाई शेख, बाळासाहेब शिरतार संजय महाडिक अक्षय अल्हाड, तोफिक इनामदार,
सुनील बर्वे सुनील थोरात, बन्सी त्रिभुवन, किशोर आडांगळे, नारायण पथवे, अर्जुन धिंदळे , भिमाबाई दिंडळे, अंजनाबाई दींदळे, संगीता धिंदळे, पार्वता दिंडळे आशाबाई धिंदळे, मारुती अस्वले, शांताबाई धिंदळे, विष्णू मुकणे संगीता वळणे, नंदिनी सोनवणे, पत्रकार संदीप शिरोळे, तरी इतर कलावंत उपस्थित होते.
विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील बहुसंख्येने लोक कलावंत उपस्थित राहिले.भीमराव पवार,मानेरे यांचं गणपती हे कलाकृती भगावयास मिळाली तसेच स्वप्निल गायकवाड यांचेही जागरण गोंधळ प्रत्यक्षात कला सादर करताना व कलावंताची व्यथा मांडताना दिसले.
त्यानंतर खेमा पथवे व खंडू गांगड यांचीही कलेचे कला सादरीकरण करण्यात आले. तसेच वाजंत्री मंडळांनीही चांगले सहकार्य करण्यात आले. शिरपुंजे येथील उत्कृष्ट महिला लेझीम पथकाचे योगदान महत्त्वाचे ठरले. लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य महिला जिल्हाध्यक्ष विमलताई डोंगरे यांनी पूर्णपणे मोर्चा करिता
संपूर्ण महिला एक संघटित करून मोर्चाकरता सक्रिय सहभाग नोंदवला. याकरिता निर्मलाताई सरोदे यांचेही मोठं योगदान लाभलं तसेच भोजमाता महिला लेझीम पथक हे देखील अगदी भर उन्हात आपली कला सादर करताना व आपल्या कलावंतांच्या न्याय हक्क मागण्या करता उपस्थित राहिले.
शहापूर भिवंडी येथून अगदी उत्कृष्ट टाळ पथक व भजनी मंडळ उपस्थित राहिले. सर्व वयोवृद्ध असून देखील अगदी उन्हाच्या झळा लागत असताना देखील अतिशय उत्कृष्टपणे कला सादर करून शासनाला जाब विचारला, तसेच या मोर्चा करिता दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळाचे मालक संजय महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशा रीतीने अडीच हजार लोक कलावंतांच्या समवेत हा मोर्चा संपन्न झाला.ह्या मोर्चा करिता आलेल्या सर्व कलावंतास बाळासाहेब शिरतार, संजय महाडिक, गुलाबराव रोकडे, बाबूलाल शेख यांनी भोजन व्यवस्था करण्यात आली.
