जुन्नरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; गुळुंचवाडी, बांगरवाडीत गारपीट

1 min read

बेल्हे दि.२३:- जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात मान्सून पूर्व पावसाने शुक्रवार दि.२२ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. आळे, बेल्हे, राजुरी, निमगाव सावा, साकोरी, पारगाव, मंगरूळ, बोरी तांबेवाडी या भागामध्ये मध्यम तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आणे पठारावरती हलक्या सरी पडल्या. बांगरवाडी येथे गारपीट झाली. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही ठिकाणी आंब्याच्या बागेचे नुकसान झाले आहे.सकाळी आभाळ ढगाळ होते. नऊ वाजल्यानंतर कडक उन्हाचा चटका जाणवू लागला. चार वाजेपर्यंत कडक ऊन होते. चार नंतर वातावरणामध्ये अचानक बदल झाला. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. वातावरण बदलामुळे नागरिकांना उकड्यापासून तात्पुरता दिलासा मात्र मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!