10 दिवसांत पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ

1 min read

नवी दिल्ली दि.२३:- महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे.इराण युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता थेट इंधन दरांवर दिसू लागला आहे.नवीन दरांनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 87 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पेट्रोलचा दर 107.87 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 94.39 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांत इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ झाली. आता झालेल्या ताज्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास 5 रुपयांची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!