चासकमान डावा कालवा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू:- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

1 min read

पुणे दि.२२:- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारा नुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चासकमान डावा कालवा परिसरातील कालव्याचे दोन्ही बाजूस १०० मीटर हद्दीत ३१ मे २०२६ रोजीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबतचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!