रविवारी आळेफाटा येथे ‘समर्पण’ इमेजिंग & डायग्नोस्टिक सेंटर चा उद्घाटन समारंभ

1 min read

आळेफाटा दि.२२:- आळेफाटा येथे ‘समर्पण’ इमेजिंग & डायग्नोस्टिक सेंटर (सोनोग्राफी व एक्स- रे) या नवीन क्लिनिकचे उद्घाटन रविवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.  या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, श्री साई देवस्थान ट्रस्ट शिर्डीचे विश्वस्त जालिंदर भोर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला विधानसभेचे आमदार किरण लहामटे हे असणार आहेत. यांसह जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलावडे, सेवानिवृत्त कलेक्टर शिवाजी जोंधळे, सेवानिवृत्त स्पेशल आय.जी शहाजी साळुंके, सहसचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई सतीश जोंधळे, कुलगुरू डॉ.राजेंद्र बंगाळ, पवार डायग्नोस्टिक सेंटरचे अध्यक्ष डॉ. अनुप पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आपण ही या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन माजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब काकड, संचालिका/ मुख्याध्यापिका जानकी विद्यालय टिटवाळा सुनिता काकड, Consulting Radiologist डॉ. भारत काकड, सचिव साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था बेल्हे अनिल गुंजाळ यांनी केले आहे. या माध्यमातून आळेफाटा व परिसरातील रुग्णांना अल्पदरात सोनोग्राफी व एक्स-रे ची सोय उपलब्ध होणार आहे.

*पत्ता*:- एच.पी.पेट्रोल पंपासमोर, मुळचंद मिलच्या बाजुला, पुणे रोड आळेफाटा. ता.जुन्नर जि.पुणे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!