मुंबईमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु असताना दगडफेक, या घटनेत 15 जणांना अटक

1 min read

वांद्रे दि.२१:- मुंबईमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु असताना दगडफेक झाली आहे, तर या घटनेत 15 जणांना अटक केली आहे. मुंबईत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक करण्यात आली आहे.मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीबनगर भागात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला काल हिंसक वळण लागले. अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे आणि महापालिकेकडून सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली आहे. याप्रकरणी कडक पावले उचलत निर्मलनगर पोलिसांनी दगडफेक करणार्या 15 जणांना अटक केली आहे.या हिंसक घटनेत 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या अनधिकृत झोपड्या हटवण्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. काल कारवाईच्या दुसऱया दिवशी इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही अचानक पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. पोलिसांनी सुरुवातीला जमावाला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र समोरून होणारी दगडफेक थांबली नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीसटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ अॅक्शन मोडमध्ये येत लाठीचार्ज केला.ज्या इमारतींमधून आणि ठिकाणांवरून दगडफेक केली जात होती,तिथे पोलीस जवान घुसले आणि त्यांनी काही जणांना जागीच अटक केले आहे. या कडक कारवाईत पोलिसांनी 15 प्रमुख आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी काल बांद्रा पूर्व येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी एफआयआर मध्ये एकूण 10 आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलमे व रेल्वे पोलीस कायदा कलम 146 आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तर दगडफेक प्रकरणात 100 ते 150 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकार्याची संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या वरही लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अद्याप 40 टक्के अनधिकृत इमारती पाडण्याचे काम शिल्लक आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही अतिक्रमणविरोधी मोहीम पुढील दोन दिवस अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मुंबईतील वांद्रे स्टेशन परिसरात, पश्चिम रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम आणि झोपड पट्ट्यानी अतिक्रमण करण्यात आलक आहे. रेल्वे स्टेशनला घासूनच या अनधिकृत झोपडपट्ठ्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची समस्याही निर्माण झाली आहे. या ठिकाणी 500 हून अधिक झोपडपट्टी असून 5 हजार स्क्वेअर मीटरवर अतिक्रमण केलेले आहे. या ठिकाणी असलेल्या कचर्यामुळे अनेकदा आगीच्याही घटना घडल्या आहेत. 27 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्यांदा या जागेवरचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश काढण्यात आले. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 9 वर्षे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू झाली. पहिल्या आणि दुसर्या दिवशीच्या कारवाईवेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. त्यावर मुंबई पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही कडक कारवाई आणखी 3 ते 4 दिवस चालण्याची शक्यता आहे. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी मार्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!