तुटलेल्या पोलवरून विद्युत पुरवठा चालू; महावितरणाचा सावळा गोंधळ?

1 min read

बेल्हे दि.२१:- आणे (ता.जुन्नर) येथील चौगुले मळा येथे महावितरणाचा सावळा गोंधळ दिसून येत असून वाऱ्यामुळे तुटलेल्या विजेच्या पोलवरून आठ ते दहा दिवसापासून सप्लाय सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.एका तारेवर अद्याप सप्लाय सुरू आहे.हा धोकादायक पोल असला तरी सप्लाय बंद करण्यात आलेला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील पोलची दुरुस्ती गेल्या ७ ते ८ दिवसापासून झालेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असेल असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सध्या आणे पठारावर पाण्याचे भीषण संकट असून विद्युत मोटार चालू करण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्यामुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची अडचण स्थानिक शेतकऱ्यांना येत आहे. १५ ते २० कुटुंब या परिसरात येथील विजेवरती अवलंबून आहेत. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण असून वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे हा पोल अधिकच धोकादायक बनत चालला आहे. त्याच बरोबर आणे परिसरात १५ ते २० पोल एका बाजूला कललेले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या व सर्वच पोलची दुरुस्ती पावसाळ्याधी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, चेअरमन माऊली संभेराव, संजय आहेर, शैलेश आहेर, महादेव आहेर, दिनेश पवार, प्रकाश दाते, जयराम दाते यांनी केली आहे.

——–

प्रतिक्रिया

 

‘आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर पोलची पाहणी केली असून दोन ते तीन दिवसांमध्ये या पोलची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल.’

 

सनी पवार, सहाय्यक अभियंता, बेल्हे महावितरण

—–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!