MHT-CET परीक्षा श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटमध्ये सुरळीत पार; प्रवेश प्रक्रियेला वेग

1 min read

बोटा दि. २० : महाराष्ट्र राज्याच्या विविध MHT-CET परीक्षा श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट, माळवाडी (बोटा) येथे अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडल्या. परीक्षेसाठी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक सुविधा, सुरक्षित वातावरण, तांत्रिक सहाय्य तसेच उत्कृष्ट नियोजन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडथळ्याविना परीक्षा पूर्ण केली.यावेळी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकवर्गासाठी देखील संस्थेमार्फत अत्यंत प्रभावी व नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पालकांच्या आरामासाठी स्वतंत्र स्वच्छ व प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, पंखे व डिजिटल बोर्ड सुविधा, कॅन्टीन व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रशस्त पार्किंग, पुरेशी लाईट व्यवस्था तसेच मोबाईल चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसोबत आलेल्या पालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध असल्याने पालकवर्गाने संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.सीईटी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडताच संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेलाही वेग दिला असून विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षांसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर कौशल्याधारित शिक्षण,रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.”तसेच सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत आपल्या करिअरची योग्य दिशा निवडावी.”संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी डी.फार्म (D.Pharm), बी.फार्म (B.Pharm), एम.फार्म (M.Pharm), बीबीए (BBA), बीसीए (BCA), एमबीए (MBA), एमसीए (MCA), अभियांत्रिकी शाखा – कॉम्प्युटर, आयटी, ई&टीसी, एआय & डीएस, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डीएमएलटी (DMLT), पीजीडीएमएलटी (PGDMLT), ॲग्रीकल्चर पॉलिटेक्निक, ॲग्रीकल्चर डिप्लोमा तसेच डेअरी डिप्लोमा असे विविध व्यावसायिक व करिअराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्लेसमेंट व रोजगारनिर्मितीवर विशेष भर देण्यात येत असून नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, उद्योगभेटी, गेस्ट लेक्चर्स, डिजिटल लर्निंग सुविधा तसेच स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!