जनावरांच्या गोठ्यात पत्नीचा गळा दाबून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी गळफास घेतल्याचे भासवले
1 min read
जुन्नर दि.१८:- ३६ वर्षीय विवाहितेला तिच्या नवऱ्याने शेतातील गोठ्यामध्ये नेऊन तेथे तिचा गळा दाबून तिला जीवे मारून हा पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिच्या गळ्याला जनावरांचा दोर बांधून गोठ्यातील लोखंडी पाईपला लटकवून तिने गळफास घेतला आहे,
असे भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या नवऱ्याला चौकशीनंतर जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले. विविध कलमानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रुपाली नवनाथ पारखे (रा. निमगाव महाळुंगे, जुन्नर) असे या घटनेतील मयत महिलेचे नाव आहे. तिचा नवरा नवनाथ बाजीराव पारखे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे.
शनिवार दि १६ रोजी दुपारी नवनाथ याने रुपाली ला शेतातील गोठ्यामध्ये नेऊन तेथे त्याने तिचा गळा दाबून तिला जीवे मारले. हा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने तिच्या गळ्याला जनावरांचा दोर बांधून गोठ्यातील लोखंडी पाईपला दोरीच्या मदतीने लटकवून तिने गळफास घेतला आहे असे भासवण्याचं प्रयत्न केला.
आपल्या बायकोला जीवे मारल्यानंतर नवनाथ हा जुन्नर पोलिस ठाण्यात आला माझ्या बायकोने गोठ्यामध्ये गळफास घेतला मी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, असे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ करीत आहेत.
