धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
1 min read
बिरेवाडी दि.१६:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ३६९ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विवीध सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला.शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी एका किल्ल्यावर गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येते
यावर्षी बुधवार, दिनांक १३ मे रोजी शालेय विद्यार्थ्यांना स्वराज्य संकल्पक भुमी किल्ले शहागड (पेमगिरी) दर्शना बरोबरच गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना माऊली उद्योग समूहाकडून बस सौजन्य देण्यात आले तसेच एकादशी असल्याने सहभागी विद्यार्थ्यांना फराळ आणि नाष्टा सौजन्य किर्ती उद्योग समूहाकडून देण्यात आले.
शहागडाच्या पायथ्याला इतिहासाची साक्ष असणारा जवळपास साडेचार एकर वरील महाकाय वटवृक्ष विद्यार्थ्यांना बघायला मिळाला.श्री. क्षेत्र अंजनीगड याठिकाणी बालसंस्कार शिबीर १४ मे रोजी आयोजित करण्यात आले. बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना ह.भ.प.नवनाथ महाराज ढेंबरे, ह.भ.प.विनोद महाराज शिंदे, ह.भ.प.सार्थक महाराज शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
सायंकाळी वारकरी संप्रदायाचे भुषण, युवा किर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज मोहिते यांचे व्याख्यान झाले. यावेळी शाबा कढणे (मा.सरपंच),पांडुरंग ढेंबरे (मा.चेअरमन), बाजीराव ढेंबरे, बाबाजी भोसले, सयाजी ढेंबरे, विठ्ठल गळंगे, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील,
अक्षय ढेंबरे, ह.भ.प.नवनाथ महाराज ढेंबरे, ज्ञानदेव ढेंबरे, अमोल गळंगे,प्रसिद्ध शिवव्याख्याते,मराठे का हारले पानिपत कादंबरीकार- ह.भ.प.शिवाजी महाराज दाते, राजेंद्र ढेंबरे, आराध्या ढेंबरे, साई ढेंबरे, कृष्णा ढेंबरे, धनश्री ढेंबरे, दिक्षा ढेंबरे, दिव्या ढेंबरे, दिया ढेंबरे, प्रणिती दाते, आरोही ढेंबरे, कार्तिक शिंदे, कृष्णा फरतारे, सार्थक शिंदे,
अथर्व गुळवे, ओम सागर, विश्वास सागर, कन्हैया मोहिते, गणेश पवार, शंभुराजे ढेंबरे, शिव ढेंबरे, देवांश ढेंबरे, किर्ती वाबळे, मंगला ढेंबरे, ज्योती ढेंबरे, उषा ढेंबरे, साक्षी ढेंबरे, आर्वी औटी, लताबाई ढेंबरे, आनंदाबाई ढेंबरे, लहानबाई ढेंबरे, नंदा सागर, प्रिया ढेंबरे, तनुजा ढेंबरे आदींसह ग्रामस्थांनी जन्मोत्सवात सहभाग नोंदवला.
