दोन वर्षे फरार आर्थिक फसवणुकीतील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या

1 min read

आळेफाटा दि.१६:- आर्थिक फसवणूक करून गेली दोन वर्षे फरार असलेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतील सानपाडा येथून शिताफीने अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोलेवाडी, कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी संदीप भोसले (वय ३८, रा. येरवडा) यांची १८ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी दत्तात्रय तावरे याने १०,००० रुपये घेऊन फसवणूक केली. विश्वास संपादन करून दोन दिवसांसाठी पत्नीची सोन्याची गंठण घेऊन, मणप्पुरम गोल्ड लोन, चंदननगर येथून १,२७,५०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेत फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात आरोपीने आणखी ३ लोकांचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीने पत्ता व मोबाईल क्रमांक बदलून बँक खातेही बंद केले होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवलदार किरण घुटे यांनी आरोपीचे अनेक मोबाईल क्रमांक तपासले.त्यातील एका चालू क्रमांकाच्या लोकेशन वरून आरोपी सानपाडा, नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. दि. १४ मे २०२६ रोजी महेश लामखडे आणी विक्रम गायकवाड यांचे पथक सानपाडा येथे रवाना झाले. स्थानिक गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी दत्तात्रय तावरे याला दाटीवाटीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीला आज दि. १५ मे २०२६ रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त सोमय मुंडे, सहा. आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या पथकाने केली आहे.

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!