पुणे ग्रामीणमधील अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार

1 min read

आळेफाटा दि.१६:- पुणे ग्रामीण हद्दीतील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण १५ % ते २० % ने कमी करण्याच्या उद्देशाने रोड सेफ्टी व चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून संपूर्ण घटकामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर *सूचनाफलक* लावण्याच्या सूचनेच्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनने जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाऊल उचलले आहे. विशेषतः अपघातप्रवण क्षेत्रे, तीव्र वळणे, घाटरस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि महामार्गांवरील धोकादायक ठिकाणी हे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.*सूचनाफलकांवरील महत्त्वाचे संदेश:* – वेगावर नियंत्रण ठेवा, जीव वाचवा – हेल्मेट तुमचे सुरक्षा कवच आहे – सीटबेल्ट लावा, सुरक्षित राहा – मद्यपान करून वाहन चालवू नका – मोबाईलवर बोलत वाहन चालवणे टाळायाबाबत बोलताना पोलीस प्रशासनाने सांगितले की, “केवळ दंडात्मक कारवाई न करता चालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे आहे. हे सूचनाफलक वाहनचालकांना वारंवार सुरक्षिततेची आठवण करून देतील.” या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढून अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास बाजगिरे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!