मॉडर्न इंग्लिश स्कूल १२ वी चा १०० टक्के निकाल; आदित्य खराडे प्रथम
1 min read
बेल्हे दि.१४:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) इयत्ता १२ वी सीबीएसई बोर्ड चा शैक्षणीक वर्ष २०२५-२६ चा निकाल १०० टक्के लागला असून सलग ९ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहिली असल्याची माहिती प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली.
प्रथम क्रमांक आदित्य वसंत खराडे ८०.२०, द्वितीय मंदार संजय तिकोन ७८.२०, तृतीय सेजल किसन जाधव ७२.६०, चतुर्थ गिरिजा शैलेश ढवळे ६८.४०, तर पाचवा समीक्षा दावला कणसे हिने मिळवला.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.
