शिक्षण, कौशल्य आणि प्लेसमेंट यांचा संगम म्हणजेच श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट:- डॉ. शिवाजी पोखरकर
1 min read
माळवाडी (बोटा) दि.१४:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “दहावी व बारावीचे यश हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरची मजबूत पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची योग्य निवड करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर द्यावा.
आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य आणि प्लेसमेंट संधी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.”संस्थेचे सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पुढील उच्च शिक्षणासाठी योग्य दिशा निवडण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या
सातत्यपूर्ण मेहनतीचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना करिअरकेंद्रित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थेमध्ये Pharmacy, Engineering, Management, Computer Science, Paramedical, Agriculture Polytechnic आणि Dairy Diploma
अशा विविध शाखांमध्ये आधुनिक सुविधा व अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण दिले जाते. संस्थेअंतर्गत D.Pharm, B.Pharm, M.Pharm, Engineering (Computer, IT, AI & DS, Mechanical, Electrical), BBA, BCA, MBA, MCA, B.Sc. (Computer Science / Information Technology), DMLT, PGDMLT, Agriculture Polytechnic, Agriculture Diploma तसेच Dairy Diploma हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे संस्थेच्या Pharmacy विभागाने मागील काही वर्षांत उल्लेखनीय प्लेसमेंट यश मिळवले असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये २२ विद्यार्थी, २०२४-२५ मध्ये ३५ विद्यार्थी तर २०२५-२६ मध्ये आतापर्यंत १५ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.
IIT Bombay Virtual Lab, Innovation Hub, आधुनिक प्रयोगशाळा, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि Placement Assistance यामुळे विद्यार्थ्यांसाठी संस्था आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी संस्थेला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
