केंद्र सरकारकडून लवकरच महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता

1 min read

दिल्ली दि.१४:- आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता भारताला याची छळ पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काटकसरीचा सल्ला दिला आहे. पण, आता मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत आहे. केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार अशी शक्यता आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली जाणार आहे. यामध्ये इंधन बचत, सरकारी खर्चांमध्ये कपात, परदेशी चलन संरक्षण आणि वर्क फ्रॉम होम सारखा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकार आणि उद्योग जगतामध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. इंधन बचत करण्यासाठी कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याा कमी झाली होती. दैनदिन वापरातील आणि जीवनावश्यक वाहनं म्हणून परवानगी दिली होती. आईटी उद्योग संघटना NASSCOM ने याबद्दल समर्थनही दिलं आहे. काही कर्मचारी संघटनांना कामगार मंत्रालयाकडून वर्क फ्रॉम होमबद्दल नियमावली जारी करण्याती शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ताफ्यात 50 टक्के कपात केली आहे. अनेक मंत्रालयं आणि भाजप शासित राज्यांनीही सरकारी वाहनांचा वापर कमी केला आहे.गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची कपात केली आहे. महाराष्ट्रसारख्या राज्यांनी सरकारी विमानांचा वापर फक्त आवश्यक कामांसाठीच मर्यादित केला आहे. सरकारने सोनं आणि चांदीवर आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्के केलं आहे. याचा उद्देश विदेशी मुद्रा भांडारावर दबाव कमी करणे आणि अनावश्यक आयात थांबवणं आहे. सरकार मेट्रो, कारपूलिंग आणि रेल्वे आधारित वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे. अनेक विभागांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या सैन्य तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये अस्थिरतेमुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग खाडी देशांतून आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्याने आयात बिल, महागाई आणि रुपयावर दबाव वाढू शकतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!