शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय

1 min read

मुंबई दि.१३:- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असून, १ मे, १९६६ पासून वर्जित प्रयोजनां व्यतिरिक्त सर्वच शासकीय कामकाज मराठीतच करण्यात येत आहे. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा वापर फारसा होत नसल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा सुरू ठेवणे संयुक्तिक ठरत नाही, असे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी नमूद केले.यासंदर्भात शासनस्तरावर चर्चा सुरू असून भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठी भाषा विभागाकडे करण्यात आली होती.या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असून,अंतिम धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे भाषा संचालक अरूण गिते यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!