बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; परिसरात भीतीचे वातावरण
1 min read
बारामती दि.१३:- बारामतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीच्या गोजुबावी येथे रेडबर्ड या कंपनीचे शिकाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा मृत झाले नसून शिकाऊ पायलट सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान ज्याठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले होते, त्याच ठिकाणी आणखी एक विमान कोसळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेड बर्ड कंपनीच हे विमान असून गोजबाबी गावाच्या हद्दीत ते पडलेले आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे.
याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमाना या ठिकाणी कोसळलेली आहे. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार इरिगेशन आणि रेड बर्ड या दोन संस्था बारामतीमध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात.
यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, २८ जानेवारी रोजी याच गोजुबावी गावच्या हद्दीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता.
मुंबईहून बारामतीला निघालेले अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. आजही गोजुबावी गावच्या हद्दीतील त्या अपघातस्थळी अजित पवार यांचे कार्यकर्ते गर्दी करत असतात.
