गणेश दूध संस्थेच्या नैमित्तिक रिक्त पदावर अशोक हाडवळे यांची बिनविरोध निवड
1 min read
राजुरी दि.१३:- गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित राजुरी (ता.जुन्नर) संस्थेच्या नैमित्तिक रिक्त पदाच्या जागेसाठी अशोक मोतीराम हाडवळे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अनुभव, प्रामाणिक कार्यपद्धती व सहकार क्षेत्रातील योगदानाच्या बळावर संस्थेच्या प्रगतीस अधिक चालना मिळेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. या वेळी चेअरमन सुभाष पा. औटी, व्हा. चेअरमन दिलीप घंगाळे, सचिव निवृत्ती हाडवळे सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गणेश सहकारी दूध संस्थेचे दूध व दुग्धजन्य पदार्थाला गुणवत्ता असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत असून ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. दूध, दही, लस्सी, ताक, श्रीखंड, पनीर, कुल्फी, तूप, पेढे यांसह अनेक पदार्थ ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत.
ही संस्था शुद्धतेची ओळख आहे. तसेच राजुरी व आळेफाटा बस स्थानक येथील विक्री केंद्रात सर्व पदार्थ उपलब्ध असतात. काही दिवसांपूर्वी आळेफाटा येथील राजुरी दूध संस्थेचे दुकानातील पदार्थांना अल्पावधीतच चांगली मागणी वाढली आहे.
