श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश

1 min read

पिंपरखेड दि.११:- पिंपरखेड (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयाने मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.७१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. विद्यालयातील पानमंद संस्कृती संतोष हिने ९८.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ढगे सुदर्शनी ज्ञानेश्वर हिने ९६.८० टक्के गुणांसह द्वितीय, शिंदे अनुष्का विकास हिने ९५.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

पिंपळे समृद्धी अनिल व ढोमे तन्वी किरण यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले. विषयानुसार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात पानमंद संस्कृती संतोष हिने १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. मराठी, विज्ञान, समाजशास्त्र तसेच इंग्रजी विषयांतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य मगर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांची मेहनत,

पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले आहे.” या यशासाठी मार्गदर्शक शिक्षक रामदास मगर, रमेश गावशेते, चौधरी सर, जाधव मॅडम, पंचरास सर, तुपेरे सर, कोल्हे सर, शेख सर, कडूसकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. विद्यालय व्यवस्थापन, शिक्षकवृंद व पालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!