थलपती विजय आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
1 min read
चेन्नई दि.१०:- अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठला आहे.थलपती विजय यांचा राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन ५ दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेचा अखेर तिढा सुटला आहे. तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर अखेर तेथील सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. तामिळनाडूत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 107 जागा मिळाल्या.
मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या चांगलेच नाकी नऊ आले. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला.मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले.काल संध्याकाळ पर्यंत त्यांचा आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली होती.
तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्तास्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वर पोहोचलंय.
हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 ने जास्त आहेत. त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला. आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज चेन्नईमध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सुरुवातीला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर आम्हाला उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती द्यावी लागतील अशी अट व्हिसीके पक्षाने थलपती विजय यांच्यापुढे ठेवली होती. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार व्हिसीकेनं टीव्हीकेला कोणतीही अट न ठेवता पाठिंबा जाहीर केला आहे.
फक्त व्हिसीकेच नाही तर आययुएमएलने देखील थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्याकडे 120 आमदार झाले असून, बहुमतापेक्षा या आमदारांची संख्या दोन ने अधिक आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा राजकारणात नवीन असलेल्या थलपती विजय यांच्यासाठी मोठा दिलासा माण्यात येत आहे. दरम्यान पक्षांचा पाठिंबा मिळताच आता तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे.
त्यामुळे आता तामिळनाडूनत टीव्हीके सत्तेमध्ये तर डीएमके विरोधी पक्षात असं चित्र आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. अखेर आता तामिळनाडूमधून सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
