जुन्नर येथून मोटरसायकल चोरणारे दोघे अटकेत १ लाख १० हजार किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

जुन्नर दि.१०:- परीटवाडी, जुन्नर येथून शाईन कंपनीची मोटारसायल चोरीला गेली होती तसेच जुन्नर पोस्टे गु.र.नंबर ११४/२०२६ भा.न्या.सं. ३०३(२) नुसार दिनांक २४/४/२०२६ रोजी जुन्नर शहरातून एक बुलेट गाडी चोरीस गेली होती. सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फत समांतर तपास करत असताना दोन्ही गाड्या ज्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या होत्या त्या ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता दोन्ही गाड्या ह्या चोरी करून ओतूर शहराच्या च्या बाजूला गेल्याचे CCTV फुटेज वरून लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने ओतूर भागात CCTV फुटेज वरून गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता इसम नामे १)समर्थ बाळासाहेब ढगे वय १८ रा.५२ गल्ली ओतूर, ता.जुन्नर जि.पुणे २)अथर्व सचिन साबळे वय २० रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे हे बिना नंबर प्लेटची शाईन मोटरसायकल वापरत असल्याचे समजले. दि. ७/५/२०२६ रोजी वरील दोन्ही इसम हे कुमशेत फाटा जुन्नर येथे येणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारा मार्फत समजले. सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी जुन्नर पो.स्टे. च्या ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पो.नि. किरण अवचर, सपोनि. महादेव शेलार,  स.फौ. दिपक साबळे, पो.हवा. राजू मोमिन, पो.हवा. संदीप वारे, पोशी. अक्षय नवले पोशी. अभिमन्यू मोटे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!