टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण, पुणे येथे समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड
1 min read
बेल्हे दि.१०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक व समर्थ आयटीआय, बेल्हे येथे टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचा संयुक्त कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात पार पडला. या कॅम्पस ड्राईव्हसाठी पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
विभागातील तसेच आयटीआय विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कंपनीकडून ॲप्टिट्यूड टेस्ट व एच.आर. इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कंपनीचे एच.आर. मॅनेजर अनिकेत गायकवाड यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली.
पॉलिटेक्निक विभागातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील विजय गायकवाड, मयूर कापसे, रिहान सय्यद, प्रशांत गडगे, सार्थ हाडवळे, रफिक सय्यद, अजय गायकवाड, रुपेश लामखडे, संकेत शेळके, तेजस बांगर, ओंकार कुरकुटे तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील स्वरूप शिंदे,
सानिका शिंदे, सानिया सरोदे , साक्षी शिरोळे, प्रगती वाढवणे, दिव्या वाव्हळ, दीपाली येवले, ऋतुजा येवले, श्रावणी दुर्गुडे, विजय गुंजाळ, योगेश खेमनर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.तसेच समर्थ आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागातील साहिल शिवाजी पावडे, दर्शन दाते सुमित खराडे,
साहिल सुरेश पावडे, डिप्लोमा इलेक्ट्रिशियन विभागातील कुणाल गाडगे, ओमकार तिकोने या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत कंपनीच्या निवड प्रक्रियेत यश संपादन केले. आयटीआय विभागामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्यांचा लाभ होऊन रोजगाराच्या संधी अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनीकडून अनिकेत गायकवाड (एच.आर. मॅनेजर), पंकज जाधव (मॅन्युफॅक्चरिंग असिस्टंट मॅनेजर), नितीन जाधव (एच.आर. रिक्रुटर) आणि दीपक मापारी (सुपरवायझर) उपस्थित होते.प्लेसमेंट प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख आदिनाथ सातपुते, कॉम्प्युटर विभागप्रमुख स्वप्नील नवले,
अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्याम फुलपगारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख संकेत विघे, भाग्यश्री शेळके,अरविंद केदार, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागप्रमुख सचिन पोखरकर तसेच समर्थ आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी, विकास सोनवणे, निकेश औटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. अनिल कपिले, प्रा. संजय कंधारे,
समर्थ आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागांचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
