श्री. जे. आर. गुंजाळ स्कूलचा दर्शन पवार ९५.४० टक्के मिळून पहिला

1 min read

आळेफाटा दि.९:- ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री.जे.आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आळेफाटा विद्यालयाने यावर्षीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 98.37% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत – 1. पवार दर्शन मदन – 95.40%, 2. पोटे आर्या संतोष – 93.00%, 3. मौलवी अरीबा जावेद – 91.20%, 4. वाळुंज प्रतिभा महेश – 90.60%, 5. मोमीन हुदा मुस्तकीन – 88.80%

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, सचिव डॉ. अनुजा गुंजाळ, तसेच सर्व विश्वस्त, शिक्षकवृंद व उप प्राचार्य विठ्ठल म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!