स्मार्ट व्हिलेज पारगावात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहन
1 min read
पारगाव दि.४:-स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे ग्रामपंचायत येथे एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वजा रोहणाचा मान ग्रामपंचायत कर्मचारी गणेश चव्हाण यांना देण्यात आला. सर्वसाधारणपणे सर्वत्र ध्वजारोहण पदाधिकारी करत असतात परंतु पारगाव तर्फे आळे येथे लोकनियुक्त सरपंच रेश्मा बोटकर यांनी आपल्या
ग्रामपंचायत कार्यालयातील पाणीपुरवठा कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा कर्मचारी गणेश चव्हाण हे गावातील सर्व नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करतात व पाणीपुरवठ्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयातही कामात मदत करत असतात
तसेच घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत मोलाचे सहकार्य करत असतात म्हणून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गणेश चव्हाण यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याचे सरपंच रेश्मा बोटकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्त उपसरपंच रामचंद्र डुकरे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम फाफाळे,
सुनिता चव्हाण ग्राम विकास अधिकारी सुनील देशमुख,गाव कामगार तलाठी ज्ञानेश्वर साळवे, वरीष्ठ लिपिक दिलीप तट्टू पाटील,प्रकाश बोऱ्हाडे, स्वप्नील डुकरे,शानु इनामदार,बुचुटे मॅडम,प्रमिला विश्वे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल गणेश चव्हाण यांनी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे आभार मानले.
