विद्या निकेतनचा संचित मुसळे ९२ टक्के मिळवून घारगाव केंद्रात प्रथम

1 min read

बोटा दि.३:- विद्या निकेतन ग्लोबल इंस्टिट्यूट बोटा संचलित, विद्या निकेतन ज्युनियर काॅलेज चा निकाल १००% लागला असल्याची माहिती प्राचार्या सुनिता कडपा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन विज्ञान शाखेतील मुसळे संचित राजेंद्र हा ९२% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्न झाला आहे. घारगाव केंद्रातही प्रथम आला आहे. तसेचJEE परीक्षेत 84.43 चा स्कोर केला आहे.द्वितिय क्रमांक मुसळे सोहम शाम (८३%) (JEE ८७) व तृतीय क्रमांक डोंगरे शुभम संतोष (८०.६७%)(JEE ९५) या दोघांनी घारगाव केंद्रात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. चतुर्थ क्रमांक मुसळे हर्षल किशोर यांनी (७८.६७%) मार्क मिळवले पानसरे ऋतुजा पोपट हिने (७७.५०%) मार्क मिळवून पंचम क्रमांक मिळवला आहे. शिंदे अभिनव दत्तात्रय या विद्यार्थ्यांने ७७% मार्क मिळवत JEE परीक्षेमध्ये सुद्धा 98 चा स्कोर केला आहे.या वर्षी विज्ञान शाखेमध्ये 102 विद्यार्थी परीक्षेस बसले होते सर्वच विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्कांनी पास झाले. पालकांकडून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व्यक्त केले जात आहे.या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्या सुनिता कडपा, कॅम्पस डायरेक्टर राहाने दिपक, प्रा.विजया जाधव, प्रा. पारळकर अमोल, प्रा. रोहिणी खेमनर, प्रा. रवींद्र गोडसे, व प्रा. दिघे स्वप्निल, प्रा.शुभांगी मगर, प्रा. राजू वाकचौरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन रामदास पोखरकर व सी.ई.ओ.डॉ. पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षक पालकांचे आभार मानले. “या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ आहे” असे त्या म्हणाल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!