आणे पठार भागाच्या वतीने भास्कर गाडगे यांचा सन्मान

1 min read

आणे दि.३:-जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक भास्कर गाडगे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवजन्मभुमी जुन्नर तालुका तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल आणे पठार भागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सन्मान करण्यात करण्यात आला. त्यांच्या निवडीला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख पांडू गाडेकर, युवासेना उपतालुका प्रमुख अभिभाऊ गवळी, शिंदेवाडी शाखाप्रमुख गोरख शिंदे, शाखाप्रमुख पिंटू शिंदे, युवानेते महेश आहेर, युवानेते किशोर बेलकर, युवानेते संतोष बेलकर, युवानेते सतीश दाते, युवानेते हर्षल दाते, समीर दाते, विनायक दाते, कसम चौघुले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!