विद्यार्थ्यांनो उज्वल यश संपादन करून याच महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून यावे:- जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर
1 min read
निमगाव सावा दि.२:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १ मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या शुभहस्ते अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच अण्णाभाऊ साठे आणि गौतम बुद्ध यांचे प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाराजांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला. विद्यार्थ्यांनो या प्रांगणातून बाहेर पडत असताना हा वृक्ष परत पुन्हा आपली वाट पाहत आहे.
आपण भविष्यामध्ये उज्वल यश संपादन करून परत पुन्हा या वटवृक्षाकडे यावे. प्रमुख पाहुणा म्हणून आपली उपस्थिती दाखवावी. आज महाराष्ट्र दिन अवघ्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी ज्या महापुरुषांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरणाचा आजचा दिवस. त्यांचे विचार अंगीकारून आपण आपले सदवर्तन करावे. संस्थे प्रति आदर ठेवावा असा उपदेश केला.

या प्रसंगी सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ.सुभाष भालेराव यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी मुक्ता विश्वासराव,गौरी साळवे, सागर खिलारी पोलीस दलामध्ये भरती झाले त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, पंचायत समितीचे सदस्य संभाजी चव्हाण, डॉ.सुभाष भालेराव,
डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे, एम.ई.सी.बी. चे एच.आर.मॅनेजर पांडुरंग तोडकर, केअरचे सीनियर मॅनेजर अजित गोरजे, प्रा शरद मनसुख, सरपंच किशोर घोडे, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, कविता पवार, राजु गाडगे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, संतोष गाडगे, निवृत्ती गाडगे, परेश घोडे, श्रीहरी भालेराव, योगेश गाडगे, इब्राहिम पटेल, रोहिदास खाडे, जितेंद्र जावळे, संजय उनवणे, गौतम, तानाजी गाडगे, बाळासाहेब गाडगे, गणपत घोडे गुरुजी,

गुलाब गाडगे, बाळासाहेब साळवे,बबन गाडगे, विठ्ठल साळवे, जितेंद्र जावळे, सुभाष मिटकरी, लक्ष्मण गाडगे,पोपट गांजे,प्रकाश जावळे,बहुसंख्य ग्रामस्थ, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

