स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान           

1 min read

पुणे दि.२:- मंचर येथील थोरांदळे पाईनमळा या ठिकाणी दामोदर जयराम मिंडे वय ६२ वर्षे रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव जि पुणे हे त्यांचे शेतावरील घरात झोपलेले असताना अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांचे डोक्यात लोखंडी पहार ने मारून त्यांचा खून केला आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २९,०००/- किं. चा मुद्देमाल जबरीने चोरी केला त्या बाबत मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१), ३११, ३(५) प्रमाणे दाखल आहे.

गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना केल्या होत्या. सदर गुन्ह्यात कुठलाही धागेदोरे नसताना cctv फुटेजच्या आधारे खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशईत इसमाचा पथकाने सुमारे ६० कि.मी. चे

अंतरात सुमारे १०० सीसीटीव्ही तपासणेत आले व या तपासात आरोपीची गोपनीय माहिती काढून सराईत गुन्हेगारावर दोन दिवस जंगल भागात पाळत ठेवून दि. ०५/०४/०२०२६ रोजी सापळा लावून पुणेवाडी परिसरातून आरोपी नामे कबीर उंबऱ्या काळे वय २४ वर्षे सध्या रा. पुणेवाडी, ता. पारनेर जि. अहिल्यानगर, व एक विधीसंघर्षित

बालक यांना जंगल भागात पाठलाग करत ताब्यात घेण्यात आले त्यांनी गुन्हयात वापरलेली पेंशन मोटार सायकल हस्तगत करणेत आलेली आहे. अशा रीतीने क्लिष्ट अन आव्हान देणारा गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच या आरोपी व त्याचे इतर साथीदार यांचेकडून ओतुर, घोडेगाव, मंचर व दिंडोरी पो.स्टे. चे इतर चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेंत अशा या उल्लेखनीय कामगिरी बाबत

स्था.गु.शा च्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स.पो.नि. महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, सहा.पो.उपनि. दिपक साबळे, पो.हवा. संदिप वारे, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, मंचर पो.स्टे. चे पो.काँ. हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, अजित पवार, या सर्वांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी यांचे हस्ते व पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांचे उपस्तितीत पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशंसाप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!