भास्कर गाडगे यांची जुन्नर तालुका प्रमुख तर आनंद रासकर यांची विधानसभा प्रमुख पदी निवड

जुन्नर दि.३०: – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. जुन्नर तालुका प्रमुख पदी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक भास्कर गाडगे (रा.निमगाव सावा) यांची निवड झाली आहे. तर जुन्नर विधानसभा प्रमुखपदी आनंद रासकर (रा. पिंपळवंडी) यांची निवड झाली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. ‘पक्षाच्या आदेशाचे नेहमी पालन केले जाईल व पदाला न्याय देण्याचे काम केले जाईल’ असे नवनियुक्त अध्यक्ष भास्कर गाडगे यांनी सांगितले तर पक्ष संघटन, युवकांना एकत्र आणणे, तसेच पक्षाने मला दिलेली जबाबदारी व माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे नवनियुक्त विधानसभा प्रमुख आनंद रासकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!