ग्रामपंचायत पोटनिवडणूकांसाठी विशेष मनाई आदेश लागू
1 min read
पुणे दि.२८:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात येणारा प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान व दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी मतमोजणी पक्रिया पार पडणार आहे.
मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस सह-आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी नागरीक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ०३ ग्रामपंचायतीची निवडणुक होणार असून, त्यामध्ये १) दक्षिण चाकण पोलीस स्टेशन (बहुळ) २) दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन (निघोजे) ३) शिरगाव पोलीस स्टेशन (गोडुंब्रे) या ग्रामपंचायतीचे हद्दीत दि.२८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०५.०० वा. पासुन खालील कृत्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
१) मतदानादिवशी मतदान केंद्रात तसेच मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात मतदान केंद्र अध्यक्ष, निवडणुक कामकाज संदर्भाने नेमलेले शासकीय व्यक्ती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले शासकीय व्यक्ती ज्यांना निवडणुक संदर्भाने संपर्क करणे आवश्यक आहे यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबाइल फोन, स्मार्ट फोन, वायरलेस किंवा संपर्क साधने वापरणेस सक्त मनाई आहे.
२) मतदान केंद्राचे २०० मीटर परिसरात तात्पुरते स्वरुपाचे पक्ष कार्यालय कोणत्याही धार्मिक, शैक्षणिक आस्थापनेत, रुग्णालयाजवळ किंवा अतिक्रमण करुन उभारणेस मनाई आहे.३) सशस्त्र संरक्षण प्राप्त व्यक्तींना मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात सुरक्षा रक्षकासह प्रवेश करण्यास मनाई आहे.
लोकप्रतिनीधीत्व अधिनियम, १९५१ कलम १३४ (ब) नुसार या कलमाव्दारे परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा त्या परिसरात शस्त्र घेवुन जाण्यास किंवा शस्त्र दाखवण्यास प्रतिबंध आहे. ४ ) मतदान केंद्राचे २०० मीटर आतमध्ये इलेक्शन बुथ लावता येणार नाही.
एका इमारतीत एकापेक्षा जास्त मतदान बुथ असतील तरी देखील त्या इमारतीसाठी एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त बुथ लावता येणार नाही.५) मतदान दिवशी मतदान केंद्राचे २०० मीटर क्षेत्रामध्ये प्रचार करणेस मनाई आहे.६) मतदान केंद्राचे २०० मिटर त्रिज्येमध्ये खाजगी वाहन आणण्यास मनाई आहे.
७) लाउड स्पीकर, मेगाफोन, आरडाओरडा करणे, गोंधळ करणे, दुवर्तन करणे, अशा प्रकारास मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आहे.८) ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते वा प्रचार कार्यकर्ते त्यांना त्या मतदारसंघात थांबणेस मनाई आहे.
९) राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने कोणतेही बल्कः ममेसेजेस पाठविण्यास मनाई आहे.१०) मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठता घेणे यास मनाई आहे.११) मतदान दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र / हत्यारं बाळगणेस मनाई आहे.
सदर आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील निवडणुक प्रक्रीया (मतदान) राबविण्यात येणार असणारे संबंधित ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्षेत्रात दि.२८ एप्रिल २०२६ रोजीचे सकाळी ०५.०० वा. ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.
