राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिराचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

1 min read

बेल्हे दि.२७:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत माहे डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस) मध्ये श्री बेल्हेश्वर माध्यमिक व कै.हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालय, बेल्हे, जुन्नर, पुणे या विद्यालयाच्या परीक्षेस प्रविष्ठ ४९ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून पैकी चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १२०० रुपये याप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.*यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:*

कल्पेश विनायक पिंगट (१४५ गुण), गौरी निवृत्ती देवकर (१३० गुण), राया दिपक शेळके (१२६ गुण), सार्थकी चंद्रकांत शिंदे (११६ गुण)या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख पांडुरंग पोटे तसेच मार्गदर्शक शिक्षक नितीन मुळूक, शीतल कळंत्रे, सीमा सुपेकर, सुरेश साबळे, मंगेश नाडेकर यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशाबद्दल शाळा समिती,शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती, ग्रामस्थ तसेच पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!