भोंदूबाबा अशोक खरातच्या फार्महाऊसमधील नको नको ते व्हिडीओ एसआयटीच्या हाती; कूकने केला खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड

1 min read

नाशिक दि.२७:- महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अशोक खरातच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी)खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून, यामुळे खरातच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरातचे सर्व कारनामे उघड केले आहेत. आता या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यांत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!