राज्यातील वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे निर्देश

1 min read

मुंबई दि.२७:- राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, येथे याबाबत आढावा बैठक झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ‘आपले सरकार सेवा केंद्रे’, आधार सेवा आणि वृद्ध कलावंत मानधन यासंदर्भातील विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे तसेच महाआयटी संचालक भुवनेश्वरी एस. तसेच जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.जालना, लातूर, परभणी, बुलढाणा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी संबंधित जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करून पात्र कलावंतांना लवकरात लवकर मानधन द्यावे. राज्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करुन त्यांची पुनर्स्थापना करावी. मुंबई उपनगरात आधार सेवांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका शाळा व महाविद्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवावा – मंत्री ॲड. शेलार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!