बेल्ह्यात हिवताप विषयी जनजागृती

1 min read

बेल्हे दि.२६:- जागतिक हिवताप दिन निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांचे मार्गदर्शनाखाली बेल्हे (ता.जुन्नर) गावातून रॅलीचे आयोजन करून हिवताप म्हणी यांच्या घोषणा आशासेविका यांचे मार्फत देऊन जनजागरण करण्यात आले. तसेच आरोग्य निरीक्षक नरेंद्र कुंडलिक देठे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना हिवताप विषयी शपथ दिली व हिवताप विषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड, डॉ. शिल्पा भोर, औषधनिर्माण अधिकारी विनायक गाडगे यांनी नागरिकांना हिवतापाची शास्त्रीय माहीती दिली. यावेळी समुदायआरोग्य अधिकारी डॉ. किरण गायखे, डॉ. अक्षय जोरी,आरोग्य निरीक्षक नरेंद्र देठे, आरोग्य सहायिक्का पल्लवी रोकडे, औषध निर्माण अधिकारी विनायक गाडगे, स्टाफ नर्स (पु) अभिषेक घोरपडे, मानसिंग परदेशी आशा गटप्रवर्तक कविता पाबळे, आरोग्यसेविका अर्चना चिवळे, सुजाता गायकवाड, आरोग्यसेवक भाऊसाहेब काळे, जगदीश ताजवे, निलेश झिने, तुषार ठुबे परिचर नितीन गोपाळे, नानाभाऊ बोरचटे, अमोल गवारी तसेच सर्व आशासेविका व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!