मंदाकिनी पुजारी यांना पारनेर भूषण पुरस्कार जाहीर
1 min read
पारनेर दि.२६:- कृषी व जनविकास प्रतिष्ठान पारनेर यांच्यावतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा पारनेर भूषण पुरस्कार 2026 हा जय मल्हार हायस्कूल जांबुत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख मंदाकिनी दत्तात्रय पुजारी (आंधळे) यांना नुकताच जाहीर झाला आहे.
शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व विकासासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा पारनेर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी पारनेर येथे संत साहित्याचे अभ्यासक, वैराग्यमूर्ती, संतभूषण ह.भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव आळंदी यांच्या शुभहस्ते, तसेच भाई कमलानंद( IAS) भूतपूर्व सचिव,खादी ग्रामोद्योग नवी दिल्ली यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
मंदाकिनी पुजारी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जांबुत गावचे सरपंच, उपसरपंच, जांबुत मधील विविध संस्थांचे चेअरमन, समस्त ग्रामस्थ जांबुत, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी धायगुडे, आर. एस. कापसे, पांडुरंग आंधळे, सतीश फिरोदिया,
पंचायत समिती शिरूर चे माजी सदस्य वसुदेवअण्णा जोरी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
