ओतूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम; HD सीसीटीव्ही बसवा, डेटा दीर्घकाळ जतन करा ओतूर पोलिसांचे आवाहन

1 min read

ओतूर दि.२६:- ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत (ता. जुन्नर) वाढत्या चोरीच्या घटना व इतर गुन्हेगारी प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण हद्दीत १० हजार सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्धार केला. असल्याच्या अनुषंगाने ओतूर पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या असून, सीसीटीव्ही यंत्रणेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी यासंदर्भात पत्राद्वारे निर्देश जारी केले आहेत.पोलीस तपासात वारंवार असे आढळून आले आहे की, अनेक दुकाने, घरे, हॉटेल्स, बँक, ज्वेलर्स व पतसंस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी त्यांचा वापर अत्यंत अपुरा आणि निष्काळजी पद्धतीने होत आहे. बहुतांश कॅमेरे केवळ आतील भागावर केंद्रित असल्याने बाहेरील भागातील रस्त्यावरील हालचालींची वाहतूक नोंद होत नाही. याशिवाय, ते अनेक ठिकाणी डेटा फक्त २ ते ३ करू दिवसांपुरताच साठवला जात असून, कॅमेरे व DVR यंत्रणा कार्यरत आहे की नाही याची कोणतीही कल्पना नाही पोलिस प्रशासनाच्या वतीने नियमित वाहन तपासणी करण्यात अडथळा निर्माण होत आहे.या गंभीर त्रुटींमुळे गुन्हे घडल्यानंतर तपासात मोठे अडथळे निर्माण होत असून, गुन्हेगारांना शोधण्यात विलंब होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.कडक सूचना व अंमलबजावणी: प्रत्येक घर, दुकान व आस्थापनाबाहेर सार्वजनिक रस्ता स्पष्टपणे कॅमेऱ्यात येईल, अशी व्यवस्था करणे बंधनकारक. उच्च दर्जाचे (HD) सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक. किमान अधिक दिवसांचा डेटा साठवणूक कालावधी सुनिश्चित करणे.कॅमेरे व DVR यंत्रणेची नियमित तपासणी करून ती सतत कार्यरत ठेवणे अनिवार्य.या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.“गुन्हे रोखण्यासाठी केवळ पोलीस यंत्रणा पुरेशी नाही, तर नागरिकांचे सक्रिय सहकार्य अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही ही केवळ औपचारिकता नसून ती गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रभावी साधन आहे,” असे स्पष्ट शब्दांत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी नमूद केले आहे.ओतूर पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे परिसरात शिस्त आणि सजगता वाढून गुन्हेगारीवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!